Published On : Thu, Sep 5th, 2024
By Nagpur Today Nagpur News

राज्यात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या;नागपूरला लोहीत मतानीसह मिळाले तीन नवीन पोलीस उपायुक्त!

नागपूर :राज्यात आयपीएस अधिकाऱ्यांच्या पुन्हा बदल्या करण्यात आल्या आहे. नुकतेच भंडाऱ्यातून मुंबईला बदली करण्यात आलेले लोहित मतानी यांची पुन्हा नागपुरात बदली करण्यात आली. मतानी यांची उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच त्यांच्यासोबत नागपुरला एकूण तीन उपायुक्त मिळाले आहेत. २०२० च्या बॅचमधील महक स्वामी तसेच निथीपुडी रश्मिता राव यांची नागपुरात उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

मतानी यांची केवळ दोन आठवड्यातच पुन्हा नागपुरात बदली-

Gold Rate
Tuesday 28 Jan. 2025
Gold 24 KT 80,300 /-
Gold 22 KT 74,700 /-
Silver / Kg 90,600 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

लोहित मतानी यांची फक्त दोन आठवड्यातच पुन्हा नागपुरात बदली करण्यात आल्याने उलट सुलट चर्चा रंगल्या आहेत.

महत्त्वाचे म्हणजे मतानी यांना नागपुरात काम करण्याचा अनुभव आहे. नागपुरातूनच त्यांची भंडारा येथे अधीक्षकपदी बदली झाली होती. तेथून त्यांची २२ ऑगस्ट रोजी मुंबईत सहायक पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) म्हणून बदली झाली होती. मात्र फक्त आठवड्यातच त्यांची परत नागपुरात बदली करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी नागपूरचे उपायुक्त निमित गोयल यांची बृहन्मुंबई पोलीस उपायुक्तपदी बदली झाली आहे.

विदर्भातील ‘या’ जिल्ह्यांनामिळाले नवीन अधिकारी –
गेल्या काही दिवसांपासून राज्यात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या बदल्या करण्यात आल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

यातच नागपूरसह विदर्भाला नवीन दमाचे अधिकारी मिळाले आहेत. सिंगा रेड्डी ऋषिकेश रेड्डी यांची गडचिरोलीत अपर पोलीस अधीक्षकपदी बदली झाली आहे. २०१९ च्या बॅचचे सुशांत सिंह यांची भारत राखीव बटालियन-५ अकोला येथील समादेशक म्हणून बदली झाली आहे.यासोबतच २०२१ च्या बॅचचे दीपक अग्रवाल यांना नागपूर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी, शुभम कुमार यांना अचलपूर उपविभागीय पोलीस अधिकारी, वृष्टी जैन यांना उमरेड उपविभागीय पोलीस अधिकारी पदी पदस्थापना देण्यात आली.

नागपूर पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य लक्ष्मीकांत पाटील यांच्याकडे मुंबईत सायबर सुरक्षा पोलीस अधीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आल्याने नागपूरसह विदर्भात कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी या अधिकाऱ्यांच्या खांद्यावर आहे.

Advertisement