Published On : Fri, Aug 23rd, 2024
By Nagpur Today Nagpur News

राज्यात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; निसार तांबोळी यांची नागपूरच्या पोलिस सहआयुक्तपदी नियुक्ती!

Nisar Tamboli nagpur

नागपूर :गृह विभागातर्फे राज्यात पाच आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.याबाबतची यादी गुरुवारी जारी करण्यात आली.

राज्य गुप्तवार्ता विभागाचे सहआयुक्त निसार तांबोळी यांची नागपूरच्या पोलिस सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर काही दिवसांअगोदर वर्ध्यातून बदली देण्यात आलेले नुरूल हसन यांच्याकडे भंडाऱ्याच्या अधीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Gold Rate
Monday 02 March 2025
Gold 24 KT 85,200 /-
Gold 22 KT 79,200 /-
Silver / Kg 94,400 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूरच्या सहपोलीस आयुक्त अश्वती दोरजे यांची मुंबईत बदली झाली होती. त्यांच्या जागी आता तांबोळी यांची या पदावर बदली झाली आहे. भंडाऱ्याचे अधीक्षक लोहित मतानी यांची मुंबईत सहायक पोलिस महानिरीक्षकपदी (कायदा व सुव्यवस्था) बदली करण्यात आली आहे. हे पद रिक्त होते. तर मतानी यांच्या जागेवर हसन भंडाऱ्याचे नवे अधीक्षक असतील. हसन हे अगोदर वर्धा येथे अधीक्षक होते. १३ ऑगस्ट रोजी त्यांची नवी मुंबईत राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ११ चे समादेशक म्हणून बदली झाली होती.

हसन व मतानी हे दोघेही नागपुरला पोलीस उपायुक्तदेखील होते. याशिवाय नंदुरबारचे अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांची १३ ऑगस्ट रोजी नागपुरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य म्हणून बदली झाली होती. त्यांना आता नागपुरात गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पोलीस विभगात बदल्यांचे सत्र सुरू असून येत्या विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने या महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

Advertisement