नागपूर : कल्पना करा की तुम्ही महामार्गावरून प्रवास करत आहात आणि तिथे वेगमर्यादेचे कोणतेही फलक नाहीत आणि तरीही तुम्हाला चलन मिळत आहे. पण आजकाल बऱ्याच लोकांसोबत हे घडत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
‘नागपूर टुडे’शी व्हिडीओ शेयर करत अलिकडेच एका नागरिकाने आपली चिंता व्यक्त केली. ज्यामध्ये त्याने सांगितले की जेव्हा तो अमरावती रोडवर गाडी चालवत होता तेव्हा त्याला एकही साइनबोर्ड दिसला नाही. परंतु चलन मात्र त्याला मिळाले.
व्हिडिओमध्ये तुम्हाला आणखी मोठी अनियमितता दिसून येते की जेव्हा रस्ता रिकामा असतो तेव्हा 20 च्या स्पीडचा साइनबोर्ड लावला जातो आणि जेव्हा जवळ सिग्नल आणि डिव्हायडर असतो तेव्हा तिथे 40च्या स्पीड साइनबोर्ड लावला जातो. हे फक्त एका व्यक्तीसोबत घडलेले नाही. आजकाल अनेक लोकांना या गोष्टींचा सामना करावा लागत आहे.
यासंदर्भात आम्ही तिथल्या पीआयशी बोललो, त्यांनी सांगितले की हा एक राष्ट्रीय महामार्ग आहे म्हणून तिथे हे मूलभूत नियम आहेत. महामार्गावरून ८० पेक्षा जास्त स्पीडने गाडी चालवणे म्हणजे नियमांचे उल्लंघन करण्यासारखे आहे.
तसेच एका दुसऱ्या नागरिकाने याप्रकरणाशी संबंधित एक फोटो शेयर केला. महामार्गावरून प्रवास करताना एकही साइनबोर्ड नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. मात्र तरी देखील त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
या गंभीर विषयावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुनरावलोकन करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.