लता मंगेशकर हॉस्पिटल मागील इसासनी येथील बोधीमग्गो सेवा संस्थेच्या बोधीमग्गो महाविहार परिसरात आज वर्षावास निमित्त भव्य वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. ह्या समारोहास ईसासनीच्या बोधीमग्गो सेवा संस्थाचे पदाधिकारी व नागपूर विद्यापीठातील पाली व बौद्ध अध्ययनचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
त्यात प्रामुख्याने महास्थविर भदंत नागदीपंकर, महास्थविर डॉ शीलवंत, भन्ते जिवनदर्शी, प्रा डॉ नीरज बोधी, प्रा डॉ तुळसा डोंगरे, प्रा डॉ सरोज वाणी (चौधरी), प्रा डॉ सुजित बोधी, प्रा सुबोध गोरले, बौद्ध अध्ययनचे विद्यार्थी उत्तम शेवडे, डॉ सतीश नगराळे, श्यामराव हाडके, किशोर रामटेके, सिद्धार्थ फोपरे, तनुजा झिलपे, पालीच्या प्रिया खोबरागडे, उज्वला वैद्य,
स्थानिक कार्यकर्ते राजेंद्र मेश्राम, मिलिंद भगत, विकी वानखेडे, प्रवीण शिंगाडे, पौर्णिमा वासनिक सहित मोठ्या संख्येने उपासक उपस्थित होते.