महादूला: आषाढी एकादशी च्या दिवशी विठुरायाच्या दर्शन न करता पर्यावरण शुद्ध ठेवण्या करिता कोराडी महादूला चे नगराध्यक्ष राजेश रंगारी यांनी वृक्षारोपण करून एक नवीन संदेश समाजाला दिला.. आज संपूर्ण देशात कोरोना चा संसर्ग पसरल्याने नागपुरातील कोरोना चा प्रादुर्भाव दिवसं दिवस वाढत असल्याने विठ्ठल रुक्मिणी च्या मंदिरात व तीर्थक्षेत्र स्थळी आज च्या दिवशी भाविकांची हजारोंच्या संख्येने गर्दी उसळली असते परंतु शासनाच्या आदेशानुसार मंदिर परिसरात भाविकांना गर्दी न व्हावी म्हणून पोलीस प्रशासन आपले कर्तव्य पार पाडत आहे.
निसर्गाला झाडांची गरज आहे पर्यावरण दूषित न वहावे म्हणून वृक्षारोपण करणे आवश्यक आहे आज वृक्षारोपण मुळे आपल्या भविष्यातील पिढी ला त्याचा चांगलाच फायदा होऊ शकतो असे नगराध्यक्ष राजेश रंगारी नी स्थानिक प्रतिनिधी शी बोलले..याच मोहिमे नुसार आषाढी एकादशी च्या निमित्ताने “वारकरी हरित क्रांती” म्हणून वृक्ष लावण्याचे संकल्प केला आहे व संपूर्ण महादूला शहरात प्रत्येक वार्डात नगराध्यक्ष यांनी आपल्या मित्र परिवार सोबत वृक्षारोपण केले… कोरोना पासून मुक्त करण्यासाठी वृक्षारोपण करून विठुरायाच्या चरणी घातले साखळे.