रामटेक: राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रामटेक येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. महाविद्यालयाच्या प्राचार्या कमल लिखार, उपमुख्याध्यापक पुरुषोत्तम बेले,पर्यवेक्षक राधेश्याम गायधने ,माजी विद्यार्थी तथा ,नगरसेवक दामोदर धोपटे,माजी विद्यार्थिनी उर्मिला देशमुख ,सेवानिवृत्त कला शिक्षक राहुल जोहरे व उपस्थित शिक्षकांच्या हस्ते बेल,बिहाडा,कडुलिंब,आवळा, कवठ, रिठा या झाडांचे रोपण करण्यात आले.
शालेय परिसरात झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात विद्यार्थी-विद्यार्थीनींनी उत्साहाने सहभाग घेतला.याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्राचार्य कमल लिखार यांनी,”वृक्ष हे आमच्यासाठी वरदान असून त्यांचे जतन व पालनपोषण आम्ही सर्वांनी एकत्र मिळून केले पाहिजे असे विचार व्यक्त केले.
पर्यवेक्षक राधेश्याम गायधने यांनी ,”झाडे जगवणे हे आमचे आद्य कर्तव्य असून ते पार पाडण्यासाठी आम्ही सर्वस्तरावर प्रयत्न केले पाहिजे.प्राणवायू देणारी झाडे दर पावसाळ्यात लावून वर्षभर त्याचे संगोपन केले पाहिजे” असे विचार व्यक्त केले.
यावेळी प्रामुख्याने शिक्षक वामन रोकडे,राजेश भोतमांगे, रंगराव पाटील,विठ्ठल वाघाडे,अशोक हटवार,अशोक नागपुरे,सुनील सेलोकर,अशोक खंडाईत,नरेश रुखमोडे,रितेश मैद, सहकारी शिक्षक कर्मचारी वर्ग राजू जुणूनकर, सुनील हटवार,दिलीप गराडे, अरविंद खेडकर,राजू नान्हे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.