कन्हान : – जम्मु कश्मीर च्या हंदवाड़ा येथील आंतकी हल्यात शहीद झालेल्या सुरक्षा दलातील शहीद कर्नल, मेजर व तीन जवाना ना कन्हान विकास मंच व्दारे भावपुर्ण श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली.
रविवार व सोमवार ला सुरक्षा बल सैनिक आणि आंतकवादी यांच्या मध्ये मुठभेड़ झाली. या हमल्यात रविवार ला कर्नल आशुतोष शर्मा, मेजर अनुज सुद व तीन जवान शहीद झाले आणि सोमवा र ला ३ जवान सैनिक शहीद झाले. यात एक नागरिक सु़ध्दा मारल्या गेला.कन्हान शहर विकास मंच व्दारे तारसा रोड शही द चौक कन्हान येथील स्मारकावर पुष्प हार, पुष्प अर्पण करून जम्मु कश्मीरच्या हंदवाड़ा येथे आंतकी हमल्यात शहीद झालेल्या वीर शहीद जवानोंना दोन मिनी ट मौनधारण करून भावपुर्ण श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी शहर विकास मंचचे अध्यक्ष प्रविण गोडे, उपा ध्यक्ष ऋृषभ बावनकर, सचिव अभिजीत चांदुरकर, नितिन मेश्राम, महेश शेंडे, प्रवीण माने, सोनु मसराम आदीसह मंच पदाधिकारी उपस्थित होते.