कन्हान : – तारसा रोड शहिद चौक येथे कारगिल विजय दिवसा निमित्य युद्धात शहिद झालेल्या वीर जवानांना कन्हान शहर विकास मंच द्वारे श्रद्धांजली अर्पण कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला.
मंगळवार (दि.२६) जुलै ला तारसा रोड शहीद चौक येथे कार्यक्रमा प्रामुख्याने मंच मार्गदर्शक भरत सावळे यांच्या हस्ते व जेष्ठ नागरिक ताराचंद निबांळ कर, प्रभाकर रुंघे, प्रदीप देशमुख यांच्या प्रमुख उप स्थितीत हनुमान नगर कन्हान येथील शहिद प्रकाश रायभाण देशमुख यांच्या प्रतिमेला व शहिद स्मारका वर पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमा ची सुरूवात करण्यात आली. यावेळी ताराचंद निबांळ कर यांनी कारगिल युद्धा बाबत उपस्थितांना मार्गदर्शन करून श्रद्धांजली अर्पित केली.
कार्यक्रमास उपस्थित सर्व मंच पदाधिका-यांनी व सदस्यांनी शहिद प्रकाश देशमुख व शहिद स्मारकावर पुष्प अर्पित करून तसेच दोन मिनटाचा मौनधारण करून कारगिल युद्धात शहिद झालेल्या देशाच्या वीर जवानांना भावपुर्ण श्रद्धां जली अर्पित करून कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला.
याप्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर, उपाध्यक्ष महेंद्र साबरे, कोषाध्यक्ष महेश शेंडे, हरीओम प्रकाश नाराय ण, आकाश पंडितकर, वैभव थोरात, प्रविण हुड, सुरेश आंबीलडुके, सुनिल हारोडे, हर्ष पाटील, जितु गजभिये , संतोष मिश्रा, रामाशिश केवट, सदानन विश्वकर्मा, केशव प्रकाश सह मंच पदाधिकारी व नागरिक बहु संख्येने उपस्थित होते.