नागपुर– सावरबांधे लेआऊट झेंडा चौक येथे सायंकाळी 7:00 समस्त नागरिकांनी सोशल डिस्टेंसिंग चे पालन करून गालवान खोऱ्यामध्ये घडलेल्या हिंसक हल्ल्यात शाहिद झालेल्या सैनिकांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली .सुरवातीला राहुल खळतकर यांनी देशभक्ती गीत सादर केले . प्रास्ताविकात राजाभाऊ रेवतकर म्हणाले अशी परकीय आक्रमणे थांबण्यासाठी, आज समाजाने एकत्रीत येणे गरजेचे आहे . परकीय वस्तूंचा वापर थांबवावा . गरज नसताना गाड्यांचा वापर करू नये .
निलेश देशमुख यांनी नागरिकांमध्ये देशभक्ती जागृत करून चिनी वस्तूंचा त्याग करण्याचे आवाहन केले .राजेश नेरकर यांनी सुद्धा आपल्या वक्तव्यातून या भ्याड हल्ल्याबाबत तीव्र निषेध व्यक्त केला . कार्क्रमाला राकेश कुमार जयस्वाल, राहुल सुलतान, रितेश जयस्वाल, मनोहरराव सावरबांधे, अमित जयस्वाल, राजाभाऊ रेवतकर, वासुदेवराव रक्षक, अरुणराव खळतकर, मधुकरराव वानखेडे, रवींद्र चाम यांची प्रमुख उपस्थिती होती .राष्ट्रगीताने कार्यक्रमांची सांगता झाली .