कन्हान : – सत्रापुर येथील डँनियल शेंडे परिवारा व्दारे महादेव पंचमढी पहाडावर २६१ किलो वजनाचा लोंखडी त्रिशुल चढविण्या करिता महादेवाचे भक्त सत्रापुर कन्हान येथुन रवाना झाले .
दरवर्षी महाशिवरात्री च्या महादेव ( शिवशंकर) मध्य प्रदेशातील पंचमढी गडावरील यात्रेकरिता कन्हान परिसरातील मोठय़ा संख्येने शिव भक्त जात असतात.
यावर्षी सत्रापुर कन्हान येथील डँनियल शेंडे परिवारा व्दारे २६१ किलो वजनाचा लोंखडी त्रिशुल बनवुन २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता तारसा रोड चौक कन्हान ते सत्रापुर डि जे च्या व हर हर महादेव च्या गर्जात मिरवणूक काढुन २२ फेब्रुवारी २०१९ ला सायंकाळी ५ वाजता वाजेगाज्यासह खांद्यावर त्रिशुल घेऊन ५१ शिवभक्तनी पंचमढी गडाकडे प्रस्थान केले.
कन्हान ते पंचमढी हिवरा पर्यंत वाहनानी प्रवास करून हिवरा पासुन पंचमढी गडावर शिवभक्त खांद्यावर घेऊन चढवुन पुजा अर्चनासह २६१किलो वजनाचा त्रिशुल रोवुन अर्पण करणार आहेत. यासोबतच लहान मोठे त्रिशुल घेऊन अनेक भक्त पंचमढीच्या शिवरात्री यात्रेकरिता रवाना झाले आहेत.