नागपूर – वर्धा जिल्ह्यातील बरबटी गावाजवळ रविवारी सकाळी मोठी घटना घडली. एका 16 चाकी ट्रकला अचानक आग लागल्याने खळबळ उडाली.हा ट्रक फाटलेल्या नोटांनी भरलेला होता.शॉर्ट सर्किटमुळे ट्रकला आग लागल्याची माहिती समोर येत आहे.
काही दिवसांपूर्वीच आरबीआयने या फाटलेल्या नोटांचा लिलाव केला होता. हा ट्रक हैद्राबादहून उत्तर प्रदेशला जात होता.याप्रकरणी सिंधी पोलिस स्टेशनने तपास हाती घेतला असून पुढील तपास करण्यात येत आहे.