कन्हान : – पोलीस स्टेशन निरीक्षक चंद्रकांत काळे व कांद्रीचे संरपच बलंवत पडोळे यांना प्रहार संघटनेच्या सौ. संगीता वांढरे यांच्या नेतृत्वात महिलांनी भेट घेऊन निवेदन देऊन कांद्री येथील धन्यवाद गेटचा बाजुला खुल्या जागेवर ट्रक व डंपरची नेहमीच आवाजावी कारभार करण्यात येत असल्याने ताबडतोब थांबविण्याची मागणी करण्या त आली आहे.
निवेदनात सादर केले की,चौकसे यांच्या मालकीच्या प्लाॅटवर अवजड वाहन पार्किंगचे ठिकाण बनले आहे. त्याकारणाने येथील स्थानिक रहिवासी यांना डंपर व्दारे उडणाऱ्या धुळीमुळे सतत त्रास सहन करावा लागतो. उक्त ठिकाण हे गावाला लागूनच असल्यामुळे त्या जागेवर अतिक्रमण करून वाहन उभे ठेवणे उचित नाही. एखाद्या वेळी एकाद्या ट्रकचा कारणाने जीवघेणा प्रकार घडु शकतो. या व्यतिरिक्त या प्लाॅटच्या बाजुला एक लहान मुलांची शाळा सुध्दा आहे. जर ग्राम पंचायतच्या वतीने योग्य पावले उचलून कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी दिनेश कनेर, देवा शेंदरे, सौ.कुसमा प्रजापती, सौ.छबीबाई चांदेकर, सौ.मनिषा परसोडे, सौ.मिरा वंजारी, सौ सुशिला विश्वकर्मा , सौ.अर्चना राठोड, सौ.शीतल काळबांडे, सौ गीता सरोदे, सौ.संगीता यादव, गिता गुप्ता, सौ.सुमीत्रा देवी, सपना भारती, सौ.रंजना नाटकर, एस के प्रजापती आदी महिला पुरूष प्रामुख्याने उपस्थित होत्या.