Published On : Tue, Aug 4th, 2020

नागपूरमधील खासगी रुग्णालयांवर पालिकेचा वॉच, तुकाराम मुंढेंकडून विशेष पथकाचं गठन

Advertisement

नागपूर : कोरोना रुग्णांवर उपचारासाठी बेड उपलब्ध व्हावेत आणि या रुग्णांची कोणतीही लुटमार होऊ नये यासाठी नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विशेष पथकाचं गठन केलं आहे (Tukaram Mundhe on private hospitals). नागपुरातील खासगी रुग्णालयांवर महानगरपालिकेचा वॉच ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

नागपूरमधील खासगी रुग्णालयांमध्ये पालिकेने ठरवून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी होते की नाही यावर हे विषेश पथक लक्ष ठेवणार आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानं हे विषेश पथक गठन करण्यात आलं. त्यामुळे खासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप लागणार असल्याचं दिसत आहे. मनपाचं हे विशेष पथक रुग्णालयांची अचानकपणे पाहणी करणार आहे. तसेच काही आक्षेपार्ह आढळल्यास तात्काळ कारवाईचा बडगाही उगारणार आहे.

Gold Rate
Saturday18 Jan. 2025
Gold 24 KT 79,600 /-
Gold 22 KT 74,000 /-
Silver / Kg 90,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार खासगी रुग्णालयांमध्ये 80 टक्के बेड राखीव ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, काही रुग्णालयांकडून याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. काही खासगी रुग्णालयं तर अतिरिक्त शुल्क आकारत असल्याच्याही तक्रारी देखील नागरिक करत आहेत. अशा रुग्णालयांवर महानगरपालिकेकडून कारवाई होणार आहे.

तुकाराम मुंढे यांनी नागपूरमध्ये जी रुग्णालयं अतिरिक्त शुल्क आकारतील त्यांची तक्रार करण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. या तक्रारींची त्वरीत दखल घेत अशा मुजोर रुग्णालयांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

नागपूरकरांना पाणी दरवाढीपासून काही काळ दिलासा
नागपूरकरांना पाणी दरवाढीपासून काही काळ दिलासा मिळाला आहे. नागपुरातील पाणी दरवाढीच्या प्रस्तावाला अद्याप परवानगी मिळालेली नाही. स्थायी समितीनं याबाबतचा प्रस्ताव जलप्रदा समितीकडे परत पाठवला आहे. कोरोनाच्या संकटकाळात पाणीदरवाढ नको म्हणून हा प्रस्ताव परत पाठवल्याचं सांगितलं जात आहे.जलप्रदा विभागाचा 5 टक्के पाणी दरवाढीचा प्रस्ताव होता. सभागृहाच्या मंजुरीनंतरच यावर निर्णय होणार आहे.

Advertisement