Published On : Mon, Sep 18th, 2023

नागपुरात एमडीची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक !

Advertisement

नागपूर: यशोधरा नगर पोलिसांनी दोन एमडी तस्करांना अटक केली आहे. शोएब खान जफर खान आणि सलीम शाह आयुब शाह अशी आरोपींची नावे असून ते शहरात एमडीची तस्करी करत होते.

पोलीसांनी आरोपींकडून 26 ग्रॅम 900 मिलीग्राम एमडी, मोबाईल, दुचाकी असा एकूण 2,78,300 रुपयांचा माल जप्त केला.

Advertisement

माहितीनुसार,यशोधरा नगर पोलिसांना विनोबा भावे नगर गेटजवळ एमडी विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.यादरम्यान आरोपींकडून एमडी पावडर जप्त करण्यात आली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.