नागपूर : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट सामन्यादरम्यान चेन्नई आणि दिल्लीच्या मॅचवरसट्टा लावणाऱ्या बुकींवर पोलिसांनी कारवाई केली आहे. यादरम्यान दोघांना अटक करण्यात आली आहे.
राजेंद्र उर्फ बाल्या सीताराम कुऱ्हाडकर (वय 45, रा. झेंडा चौक, महाल) आणि सिताराम विठोबाजी मोहाडीकर (55, रा. टिमकी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. राजेंद्र कुऱ्हाडकर हा कोतवाली पोलिसांच्या हद्दीत क्रिकेट सामन्यावर सट्टा लावत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने क्रिकेट सट्टेबाजीत सहभागी असलेल्या दोघांना यशस्वीरित्या पकडले.पथकाने तत्परतेने छापा टाकून राजेंद्र कुऱ्हाडकर याला पकडले. त्याच्याकडून एकूण ४० लाखांचा मुद्देमाल जप्त पोलिसांनी जप्त केला लॅपटॉप, मोबाईल फोन, लॉटरीची तिकिटे आणि 3,200 रुपये रोख यासह 59,310 मालमत्ता पोलसांनी हस्तगत केली आहे.
दरम्यान, तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या टिमकी परिसरात सीताराम मोहाडीकर हेही त्यांच्या घरी क्रिकेट सामन्यावर सट्टा लावत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मोहाडीकर यांच्या निवासस्थानावर छापा टाकला, ज्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी एक लॅपटॉप, मोबाईल फोन, सेट टॉप बॉक्स, लॉटरीची तिकिटे आणि रोख एकूण 1,00,252 रुपये जप्त केले. अटकेनंतर दोन्ही आरोपींना पुढील चौकशीसाठी स्थानिक पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.