Advertisement
नागपूर: झोन 1 चे पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांच्या निर्देशानुसार एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू असेलल्या जुगार अड्ड्यावर कारवाई करण्यात आली.
या कारवाई अंतर्गत ओमप्रकाश उर्फ सोनू तुळशीदास जयकल्याणी याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीसह इतर 5 जणांना ताब्यात घेतले. तसेच आरोपींकडून 21 हजार 610 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर दुसरी कारवाई खामला येथे करण्यात आली. पोलीसांनी अफसर खान या प्रमुख आरोपीसह एकूण 11 आरोपींना अटक केली.यादरम्यान आरोपींकडून 47 हजार 335 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत पुढील तपास सुरू केला आहे.