Advertisement
नागपूर : सक्करदरा आणि नंदनवन पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करीत दरोड्याच्या तयारीत असणार्या दोन टोळ्यांच्या मुसक्या आवळल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांच्या या कारवाईत टोळ्यांतील ८ आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे.
माहितीनुसार, सक्करदाऱ्याच्या बिंझाणी कॉलेजच्या आवारात झुडुपांमध्ये गोपाल ऊर्फ बाला पिंपळकर, सैय्यद बिलाल,गौरव ऊर्फ टकल्या बोरकर आणि शैलेश ऊर्फ बाजा बोरकर सर्व रा. जुने बिडीपेठ हे दडी मारून बसले होते. गस्तीवर असलेल्या सक्करदरा पोलिसांचे त्यांच्यावर लक्ष पडले. पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केल्याची माहिती आहे. या टोळीकडून पोलिसांनी ३ चाकू, तलवार, दांडा, दोर, मिर्ची पावडकर असे दरोड्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले.