Advertisement
नागपूर : शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असतानाही नागपुरात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढल्याची चर्चा आहे. यातच शहरात दोन चोरीच्या घटना घडल्याचे समोर आले आहे.
किनखेडे ले-आऊट येथील चंद्रशेखर पराते यांच्या घरात चोरट्यांनी 51 हजार रुपयांची रोकड, मोबाईल फोन आणि मोटारसायकल चोरून नेली. या घटनेसंदर्भात यशोधरानगर पोलिसांनी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.दुसऱ्या घटनेत जय दुर्गा नगर येथील कृष्णा सतीकोसरे यांच्या घरातून रोख रकमेसह एक लाख रुपयांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी झाली आहे. यासंदर्भात पारडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.