कन्हान : – कांद्री-बोर्डा टोल नाक्याच्या मागील शेतात धानाची लावन चालु असताना एकाएक विज पडुन राधेलाल डहारे चा मुत्यु झाला तर दोन शेत मजुर किर कोळ जख्मी झाले तर दुस-या घटनेत निलज शिवारा तील शेतात विज पडल्याने महिला शेत मजुर नंदाबाई खंडाते चा मुत्यु झाला असुन दुसरी महिला रेखा चौधरी गंभीर जख्मी झाल्याने खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.
गुरूवार (दि.४) ऑगस्ट ला सायंकाळी ४.१५ वाजता दरम्यान विजेच्या कडकडयाका सह पाऊस आल्याने नागपुर बॉयपास चारपदरी महामार्गावरील कांद्री-बोरडा टोल नाक्याच्या मागील शेतात धानाची लावनी चे काम करण्यारे राधेलाल भिमराव डहारे वय २५ वर्ष राह. आजनी (फुटाणे ची) ता. रामटेक या शेत मजुरांच्या अंगावर विज पडुन त्याचा मुत्यु झाला तर सोबत काम करणारे दोघे किरकोळ जख्मी झाले. मृतक राधेलाल डहारे यांचा मृतदेह ग्रामिण उपजिल्हा रूग्णालय कामठी येथे नेण्यात आला. दुसरी घटना सायंकाळी ४.३० वाजता दरम्यान निलज (खंडाळा) शिवारातील शेतात विज पडुन शेतात धानाच्या लावनी चे काम करणारी नंदाबाई रामकृष्ण खंडाते वय ३२ वर्ष राह. निलज ता. पारशिवनी हिचा अंगावर विज पडुन मुत्यु झाल्याने तिचा मुतदेह ग्रामिण उपजिल्हा रूग्णालय कामठी येथे नेण्यात आला.
तसेच सोबत काम करणारी रेखा मुकेश चौधरी वय ३५ वर्ष राह. निलज (खंडाळा) ही गंभीर जखमी झाल्याने कन्हान येथील खाजगी वानखेडे दवाखान्यात दाखल करून उपचार करण्यात येत आहे. घटनेची माहीती मिळताच कन्हान पोलीस, पटवारी घटनास्थळी पोहचुन पंचासह पंचनामा करण्यास पोहचले.
“दामिनी अँप” मुळे विज पासुन प्रतिबंधात्मक उपाय.
विदर्भातील सर्व जिल्हयात मा. जिल्हाधिका-यांनी ग्रा प पदाधिकारी, सचिव, कर्मचारी, पटवारी, मंडळ अधिकारी, तालुका व पंचायत समिती आणि कृषी अधिकारी , कर्मचा-यांना भारत सरकार चा “दामिनी अँप ” डाऊन लोड करण्याच्या आदेश व सुचना दिल्या आहे. कारण दामिनी अँप हे परिसरात विज पडण्याची पुर्व सुचना मोबाईलवर देत असल्याने विजे पासुन नागरिकांच्या जिव वाचवुन मुत्यु च्या घटना कमी करता येऊ शकते. परंतु नागपुर जिल्हया तील पारशिवनी तालुक्यात या आदेश व सुचनाची शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकारी बहुतेक अमल बजावनी करताना दिसत नसल्याने तालुक्यात विज पडुन मुत्युचे प्रमाण वाढत आहे. आता तरी ” दामिनी अँप ” आपल्या मोबाईल मध्ये डाऊन लोड करून विजे पासुन आपल्या परिसरातील नागरिकांची सुरक्षता करता येईल.
१) कांद्री- बोरडा टोल नाका मागील शेत
२) निलज शेत शिवारातील शेत
३) व ४) मुतक.- नंदाबाई खंडाते
५) पंचनामा करताना पोनि विलास काळे, पोलीस, पोलीस पाटील, पटवारी व ग्रामस्थ