नागपूर : गाैरी विसर्जनासाठी गेलेल्या दोघांचा सावनेर पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील धापेवाडा (ता. सावनेर) येथील चंद्रभागा, तर खापरखेडा (ता. सावनेर) पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील चनकापूर (ता. सावनेर) येथील काेलार नदीच्या पात्रात दाेघांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. तर दोघांना दाेघांना वाचविण्यात तरुणांना यश आले. या दाेन्ही घटना मंगळवारी (दि. १९) दुपारी घडल्याची माहिती आहे. सागर दिनेश लाडसे (१८, रा. धापेवाडा, ता. कळमेश्वर) व प्रल्हाद दीपक केसरवानी (१२, रा. वाॅर्ड क्रमांक-२, चनकापूर, ता. सावनेर) अशी मृतांची नवे आहेत. तर साजन दिनेश लाडसे (१७, रा. धापेवाडा) व मंथन जितेंद्र बावने (१२, वाॅर्ड क्रमांक २, शिवनगर, चनकापूर) अशी वाचवण्यात आलेल्या मुलांची नावे आहेत.
या घटनांची माहिती मिळताच नदीत बुडालेल्या मृतांचा मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी नागपूर शहरातील मेयाे रुग्णालयात पाठविला. या दाेन्ही प्रकरणांत सावनेर व खापरखेडा पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून पुढील तपास सुरू केला आहे.