नागपूर : नागपूर येथील विमानतळावर सीमाशुल्क विभागाने मोठी करवाई केली. मंगळवारी पहाटे 3.15 वाजता कतारहून आलेल्या दोन तरुणांना सीमाशुल्क विभागाने दोन किलोहून अधिक सोन्यासह पकडले. त्याची किंमत एक कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले. दोघांनी हे सोने आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये लपवून पेस्ट स्वरूपात आणले होते.
मो. शाहीद नालबंद (33 रा हुबळी कर्नाटक) पीरबाबा कलंदर बाबूसा सौदागर (38 रा.हंगल कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.दोघांकडून मोबाईल फोन, पासपोर्ट आणि सोने जप्त करण्यात आले आहे.
कस्टम विभागाने रचला सापळा : कतार एअरवेजमधून दोन जण सोन्याची तस्करी करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कस्टम विभागाने मंगळवारी मध्यरात्रीनंतर नागपूर विमानतळावर सापळा रचला. विमान नागपूर विमानतळावर उतरताच कस्टम अधिकाऱ्यांनी दोन प्रवाशांना थांबवून एका खोलीत नेऊन त्यांची झडती घेतली. या दोघांकडून २ किलोहून अधिक सोने सापडले आहे. हे सोने पेस्ट स्वरूपात होते आणि सोन्याचे कॅप्सूलमध्ये रूपांतर केले होते. कॅप्सूल प्रायव्हेट पार्टमध्ये ठेवणे सोपे आहे. दोघेही पहिल्यांदाच नागपूर विमानतळावर उतरले आहेत. या दोघांची कस्टम विभाग चौकशी करत आहे. त्यांच्या दोन्ही मोबाईलचे सीडीआर काढले जात आहेत. सायबर तज्ज्ञांचीही मदत घेण्यात येणार आहे. चौकशीदरम्यान दोघांनी अद्याप सूत्रधाराचे नाव उघड केलेले नाही. कस्टमने या प्रकरणाचा तपास एसआयबीकडे सोपवला आहे.