नागपूर:यशोधरा नगर पोलिस ठाण्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांना बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग ऑपरेटरकडून खंडणी घेतल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे.हेड कॉन्स्टेबल मंगेश लांजेवार आणि कॉन्स्टेबल हर्षद रहिस शेख अशी या अधिकाऱ्यांची नावे आहेत.
माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांनी सिलेंडर मध्ये गैस भरण्याची गाडी त्यांनी पकडलेली होती व गाडी चालकाला ५० हजार रुपयाची मागणी केली होती. त्यानंतर चालकाकडून अडीच हजार रुपये घेऊन त्याला सोडण्यात आले.
गॅस रिफिलिंग ऑपरेटरने याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार केली.चौकशीत दोन्ही पोलीस कर्मचारी दोषी ठरल्यानंतर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलत त्यांना निलंबित करण्यात आले आहे.