Advertisement
नागपूर : दिघोरी येथील संजुबा हायस्कूलच्या मागे टेक ऑफ गार्डन सोसायटीत चोरीच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. या घटनेने येथील स्थानिकांमध्ये एकच खळबळ उडाली. तसेच परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
हुडकेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, D, E आणि F wing मध्ये ही चोरीची घटना घडली. यामधील एका फ्लॅटमधून ५० हजार आणि दुसऱ्या फ्लॅटमधून १० हजार एकूण ६० हजार रुपये रक्कम चोरांनी लंपास केल्याची माहिती आहे.
चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून हुडकेश्वर पोलिसांकडून घटनेची सखोल चौकशी करण्यात येत आहे.