नगर: केडगाव उपनगरातील शाहूनगर भागातील मुळे मळा येथे दोन शिवसेना पदाधिका-यांची आज हत्त्या करण्यात आली. संजय कोतकर व वसंत ठुबे असे मृतकांची नावे आहेत. दरम्यान, घटनेची माहिती समजताच परिसरात मोठ्या संख्येने जमाव जमला. संतप्त जमावाने पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक केली. नगर- पुणे महामार्गावर रास्तारोको करण्याचा प्रयत्नही शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकत्यांनी केला. शनिवारी सकाळी महापालिकेच्या पोटनिवडणूकीचा निकाल लागल्यानंतर सायंकाळी ही घटना घडल्याने राजकीय वादातूनच ही हत्या झाल्याची चर्चा आहे.
संजय कोतकर व वसंत ठुबे असे मृतांची नावे आहेत. कोतकर हे सेनेचे केडगाव शहर उपप्रमुख होते, तर ठुबे हे कार्यकर्ते होते. महापालिकेतील केडगाव येथील प्रभाग क्रमांक 32 साठी काल मतदान झाले. या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. कॉग्रेसचे विशाल कोतकर यांना दोन हजार 340 मते मिळाली. शिवसेनेचे विजय पठारे यांना एक हजार 886 मते, तर भाजपच्या महेश सोले यांना केवळ 156 मतांवर समाधान मानावे लागले. नोटाला 50 जणांनी पसंती देऊन मतदानप्रक्रियेत भाग घेतला.
माजी आमदार अनिल राठोड यांनी ही जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकायचीच असे ठरवून विजय पठारे यांना साथ दिली. शिवसेनेने स्वतंत्र निवडणुका लढविण्याच्या निर्णयानंतर ही पहिलीच निवडणूक होती. महापालिकेत एकहाती सत्ता असतानाही शिवसेनेनेला ही जागा गमावाली लागली.