कामठी :-सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी कामठी तालुका प्रशासन तत्परतेची भूमिका साकारत असली तरी तालुक्यातील कोरोना बधितांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढीवरच आहे काल कोरोना चा आकडा 58 वर गाठलेला असता आज आलेल्या कोरोना पॉजिटीव्ह अहवालात कामठी तालुक्यातील 36 रुग्ण कोरोना बाधित आढळले असून आज दोन कोरोनाबधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर आजपावेतो एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या ही 512 झाली आहे तर आजपावेतो एकूण 14 रुग्ण हे कोरोनाबधित होऊन मृत्यूस बळी ठरले तर 213 रुग्ण हे कोरोनावर मात करून उपचार घेऊन घरी परतले आहेत यानुसार आजपावेती 285 रुग्ण हे उपचार घेत आहेत.
आज कामठी तालुक्यात आढळलेल्या 36 रुग्णामध्ये 11 रुग्ण हे महादुला येथे आढळले तर इतर 25 रुग्ण हे कामठी शहर व ग्रामीण मध्ये आढळले आहेत यानुसार महादुला 11,रणाळा 03, रमानगर 03,द्रजीपुरा 04, तर अशोक नगर , आंबेडकर नगर,इस्माईलपुरा, जयभीम चौक, नायनगर ,दाल ओली,नया बाजार,न्यू येरखेडा, बी बी कॉलोनी, बोरियापुरा, भाजीमंडी, मोंढा,मोदी पडावं,व सैलाबनगर च्या प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. या सर्व रुग्णांना नागपूर च्या मेयो मेडिकल इस्पितळातील विलीगिकरंन कक्षात हलविन्यात आले आहे.
संदीप कांबळे कामठी