रामटेक: रामटेक येथील गुरुकुल नगर निवासी निखिल अरुण कोसेकर (वय 25 वर्षे)याचा मनसर जवळ दुचाकीला अपघात होऊन जागीच मृत्यू झाला. निखिल कोसेकर नागपूर येथील फुलस्ट्राँग मायक्रो फायनान्स कंपनीत काम करीत होता.नेहमीप्रमाणे तेथील काम आटोपून तो रामटेकला परत येतांना रात्री दहाला मनसर नागपूर रोडवरील oriyantal कंपनीजवळ समोर एक ट्रक उभा होता. बाजूने एक गाडी येत होती.
त्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकी क्रमांक एम एच 40 बी क्यू 8089 ही हिरो होंडा गाडी ट्रकवर आदळली.निखिल तिथेच पडून असतांना ट्रक चालक मात्र फरार झाला. रात्री एक प्रवासी तिथून जातांना त्याला हा अपघात झाल्याचे दिसताच त्याने चौकशी करून त्याच्या नातेवाईकाना फोन केला.
त्यावेळी निखीलचा जागीच मृत्यू झाला होता.रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टेम झाल्यानंतर त्याचे शव नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.पुढील तपास मनसर पोलीस चौकीचे हवालदार गजानन उकेबोन्द्रे व संजय तिवारी करीत आहेत.निखिलचे दोनच वर्षापूर्वी लग्न झाले होते आणि त्याला पत्नी व सव्वा वर्षांची मुलगी आहे.रामटेकच्या स्मशानभूमीत आज त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.