कामठी: -स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गरुड चौक येथील एस बी आय बँकेसमोरून येरखेडा रहिवासी अशोक भीमटे वय 62 वर्षे यांची दुचाकी डी ओ क्र एम एच 40 ए बी 8007 चोरीला गेल्याची घटना 27 मार्च ला दुपारी 12.30वाजता घडली असता फिर्यादी अशोक भीमटे यांनी कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यावरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवित तपासाला गती देत दुसऱ्याच दिवशी आरोपीचा शोध लावीत त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून 4000 रुपये किमतीचे सक्रॅब जप्त करण्यात आले.अटक आरोपीचे नाव प्रज्वल सुखदेवे रा इंदिरा गांधी नगर नागपूर असे आहे.
ही यशस्वी कारवाही डीसीपी निलोत्पल, एसीपी रोशन पंडित, गुन्हे पोलीस निरीक्षक मंगेश काळे यांच्या मार्गदर्शनार्थ पी एस आय वारंगे, पो हवा दिलीप कुमरे, वेदप्रकाश यादव, श्रीकांत भीष्णुरकर, आशिष बारकुंडे, मंगेश गिरी, रोशन पाटील यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे
संदीप कांबळे