नागपूर/कन्हान: बेवारस कुत्र्यानी नगरपरिषद कन्हान च्या दोन महिलांना चावा घेऊन गंभीर जखमी केल्याने शहरात बेवारस कुत्र्याची कमालीची दहशत नागरिकांन मध्ये निर्माण झाली आहे.
नगरपरिषद कन्हान-पिपरी अंतर्गत रहिवासी क्षेत्रात मागिल दिड वर्षा पासुन बेवारस कुत्र्यांच्या झुंडानी छोटे मुले, महिला पुरूषाना चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे. मंगळवार (दि.१३) ला दुपारी २ ते ३ वाजता दरम्यान सत्रापुर येथील सारीका शेंडे वय २७ वर्ष व पिपरी येथील विमलबाई भालेकर वय ४८ वर्ष यांच्या पायाला जोरदार चावा घेऊन पाय फोडून गंभीर जखमी केल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे प्राथमिक उपचार करून शासकिय मेयो रूग्णालय नागपूर येथे अतिदक्षता विभागात उपचारार्थ भर्ती करण्यात आले असून एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलल्या जात आहे.
या बेवारस कुत्र्याच्या बंदोबस्त लावण्यात यावा या करिता युवा सामाजिक कार्यकर्ता प्रशांत मसार यांच्या नेतृत्वात वारंवार निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे. परंतु नगरपरिषदे व्दारे ठोस कारवाई करण्यात येत नसल्याने नागरिकांन मध्ये नगरपरिषद प्रशासना विरोधात जनआक्रोश वाढत आहे.