नागपूर : शहरातील इतवारी परिसरात असेलल्या नेहरू पुतला चौकात मारबत उत्सव पाहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांना सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदारांनी जबर मारहाण केली. या मारहाणीचा व्हीडिओ समोर आला आहे. ऋतुराज महाजन (26)आणि लकी इनूरकर (28, रा. कॉर्पोरेशन कॉलनी, हुडकेश्वर रोड) अशी जखमी तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल करून तीन आरोपींना अटक केली आहे. तर इतर तीन आरोपी हे अल्पवयीन आहेत.रौनक समुद्रे (18), अभय हजारे (24), नकुल गौरकर (18) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर अल्पवयीन आरोपींना विचारपूस केल्यानंतर सोडण्यात आले.
मारबत उत्सव पहाण्यासाठी ऋतुराज आणि लकी नेहरू चौकात गेले होते.आरोपी रौनकला ऋतुराजचा धक्का लागला यावरून हा वाद पेटल्याची माहिती आहे.या गुन्हेगारांपैकी तीन अल्पवयीन मुलांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्यांच्यावर एमपीडीएही लावला होता. 4 महिन्यांपूर्वीच त्याची तुरुंगातून सुटका झाली होती. ऋतुराज आणि लकी मंगळवारी सकाळी मारबत उत्सव पहाण्यासाठी नेहरू पुतळा चौकात गेले होते. आरोपीही हा उत्सव पाहण्यासाठी आवारात आले.आरोपी रौनकला ऋतुराजला धक्काच बसला. यावरून वाद झाला.आरोपींनी ऋतुराज आणि लकी यांच्यावर हल्ला केला. लाठ्या, दगडांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, अभयने धारदार शस्त्र काढून ऋतुराजच्या मानेवर वार केले. दोघांना जबर जखमी करून आरोपी पळून गेले. लकडगंज पोलीस घटनास्थळी पोहोचले. दोन्ही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांची चौकशी केल्यानंतर आरोपींची नावे उघड झाली.