मुंबई : राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीबाबतच्या प्रकरणावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. त्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा झटका बसला आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेचे कोल्हापूर शहराध्यक्ष सुनील मोदी यांनी ही याचिका दाखल केली होती. ऑनलाईन पार पडलेल्या या सुनावणीला स्वतः याचिकाकर्त्यांनी हजेरी लावली होती. न्यायमूर्ती बोरकर आणि न्यायमूर्ती उपाध्याय यांनी या याचिकेच्या निकलाचे वाचन केले.
दरम्यान : राज्यपाल नियुक्त आमदारांच्या शपथविधीला विरोध करीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातर्फे मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. शिवसेनेचे ( उद्धव ठाकरे पक्ष) कोल्हापूर शहरप्रमुख सुनील मोदींनी या प्रकरणी या निर्णयाला विरोध करीत दाद मागण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, शिवसेना ठाकरे पक्षाला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नव्हता.
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या समोर याप्रकरणी सुनावणी झाली होती. महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यपालांनी सात विधान परिषद आमदार नेमण्याचे गॅझेट प्रसिद्ध केले होते. त्या विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींसमोर या प्रकरणी तातडीने दाद मागण्यात आली होती. मात्र, राज्यपाल नियुक्त आमदारांच्या शपथविधी प्रकरणात तातडीने निर्णय देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता.