Advertisement
मुंबई: एकीकडे सर्व राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात निलंबनाची कारवाई झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी पाच नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
माजी आमदार रुपेश म्हात्रे, विश्वास नांदेकर, चंद्रकांत घुगूल, संजय आवारी, प्रसाद ठाकरे यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख रुपेश म्हात्रे यांची पक्षविरोधी कारवाया केल्या. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.