ठाणे :महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना मुख्यमंत्री पदावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी भाजपाला घाबरवून २५-३० आमदार फोडायचे पूर्ण प्लॅनिंग तयार केले होते,असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
उद्धव ठाकरेंना ५ वर्ष मुख्यमंत्रिपदी बसायचे होते.भाजपाचे संख्याबळ कमी व्हावं यासाठी १२ जणांना निलंबित केले.भाजपाच्या ४-५ नेत्यांना अटक करायचे प्लॅनिंग होते, असेही शिंदे म्हणाले.
ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी महायुतीची बैठक आयोजित केली होती. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. वर्धापन दिनावेळी आईचं दूध विकणारी टोळी आणि बरेच काही भाषण केले.
मला राज्यसभा, विधान परिषदेच्या प्रक्रियेतून बाहेर काढले. भाजपाच्या लोकांना आत घालून मलाही संपवण्याचे कटकारस्थान होते, एका गुन्ह्यात माझे खोटे नाव गोवण्याचे सुरू होते, अशी माहितीही मुख्यमंत्री शिंदेंनी दिली.