नागपूर : राज्यात मराठा समाजाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप -प्रत्यारोपाच्या फैऱ्या रंगल्या. उद्धव ठाकरे सरकारने ओबीसी संदर्भात केस टिकवली असती तर आज मराठा समाजावर ही वेळ आली नसती. ठाकरेंनी मराठा समाजाची माफी मागायला पाहिजे, अशी मागणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलतांना केली.
उद्धव ठाकरे सत्तेत असताना जे काही राजकारण केले ते जनतेला आवडले नाही. ठाकरे भाजपसोबत निवडून आले आणि नंतर मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण विषयावर त्यांची भूमिका काय होती. मूक मोर्चा संदर्भात त्यांनी कोणते विधान केले होते. आज आम्ही सत्तेत आहे उद्या अजून कोणी येईल .तुम्ही आम्ही कायम राहणार नाही, मात्र राज्य कायम राहणार आहे . लोकशाहीमध्ये मुद्द्यावर राजकारण व्हावे गुद्यावर होऊ नये , असा टोलाही मुनगंटीवार यांनी ठाकरेंना लगावला.