माढा: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरु झालेल्या प्रचार सभांमध्ये विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.यातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महायूतीवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडली नाही. आता भाजप नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या जाहीर टिकेवरून त्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. उद्धव ठाकरेंचा केजरीवाल होईल, असा इशारा भाजप नेते प्रसाद लाड यांनी दिला आहे. या टिकेवरून राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
भाजप नेते प्रसाद लाड हे सध्या माढ्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. देशात अरविंद केजरीवाल वाचले नाहीत. त्याप्रमाणे उद्धव ठाकरे वाचणार नाहीत. उद्धव ठाकरेंचा अरविंद केजरीवाल होईल,असा घणाघात लाड यांनी केला.
उद्धव ठाकरे यांनी ‘मेलेल्या माणसाच्या टाळू वरचे लोणी खाण्याचे काम केले.शिवसेनेने जाहिरातीमध्ये पॉर्नस्टार वापरला. युवराजांना हे नवीन नाही, संध्याकाळ झाली की तेच आहे, त्यामुळे त्यांना ते नवीन नाही.
मशालीची आईस्क्रीम होईल, तुतारी गळून पडेल. पंजा गळून पडेल अशी अवस्था महाविकास आघाडीची होईल,अशा शब्दात लाड यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.