सिंधुदुर्ग : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय नेते कामाला लागले आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सिंधुदुर्ग दौरा कारणार आहेत. हे पाहता ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांची २०२४ साठी सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघासाठी पुन्हा उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे.
लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची चर्चा करून ते आढावा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरे फेब्रुवारी महिन्यात सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार आहेत. उद्धव ठाकरे ४ आणि ५ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग रत्नागिरी दौऱ्यावर असणार आहेत.
यादरम्यान ठाकरे लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेऊन स्थानिकांशी संवाद साधणार आहेत. त्याचप्रमाणे रिफायनरी विरोधी नागरिकांशी ते बारसुमध्ये चर्चाही करतील. आपल्या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाऊन उद्धव ठाकरे भेट देणार आहे. त्यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या फंडातून झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवीन सिंहासनाचं पूजन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.