कन्हान : हुजुर मरियम अम्मा साहेब दरगाह गाडेघाट (जुनीकामठी) येथे तीन दिवसीय ९६ वा सालाना उर्स शरीफ चे आयोजन करण्यात आले आहे .
दिनांक ११ ते १३ जुलै ला तीन दिवसीय हुजुर मरियम अम्मा साहेब दरगाह गाडेघाट (जुनीकामठी) येथे तीन दिवसीय ९६ वा सालाना उर्स शरीफ चे आयोजन करण्यात आले असुन बुधवार दि. ११जुलै २०१८ ला नमाजे ईशा मिलाद शरीफ ने ९६ व्या उर्स शरीफ ची सुरूवात करण्यात येईल व मध्यरात्री च्या नंतर मजारे पाक. गुरूवार दि. १२जुलै दुपारी १२. ३० वाजता हुजुर मरियम अम्मा साहेब दरगाह गाडेघाट येथुन दरबारी शाही संदल निघुन पिपरी मार्ग आंबेडकर चौकातुन रेल्वे स्टेशन कन्हान येथे पोहचेल.
तसेच बाबा ताजुद्दीन मोठा ताजबाद नागपुर येथुन शाही संदल निघुन कामठी च्या बाबा अब्दुल्लाह शाह दरगाह येथे चादर चढवुन कन्हान रेल्वे स्टेशन ला पोहचुन दोन्ही शाही संदल एकत्र कन्हान शहराचे भ्रमण करून तारसा रोडनी गहुहिवरा रोड आदीवासी गोवारी चौक, शहिद चौक, तारसा रोड चौक, आंबेडकर चौकाकुन पिपरी मार्गे गाडेघाट पोहचुन शाही संदलचे समापन करण्यात येईल.
तंदनंतर सायंकाळी ६.वाजता झेंडा वदन करून शाही चादर चढविण्यात येईल. रात्री १० वाजता मिलाद शरीफ महफिले कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . शुक्रवार दि. १३जुलै ला सकाळी वाजता महाप्रसाद वितरण करून सालाना उर्स शरीफ चे समापन करण्यात येईल. यास्तव या सालाना उर्स शरीफ मध्ये सहभागी होऊन कार्यक्रमाचा ला़भ घ्यावा असे आवाहन मरियम अम्मा दरगाह गाडेघाट कमेटी च्या वतीने करण्यात आले आहे .