शनिवारपासून भाजी बाजार बंद
बेला: आपत्ती व्यवस्थापक समिती स्थानिक प्रशासन व पोलिसांनी मुख्य रस्त्यावर भाजीबाजार पर्यायी खुली जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे मात्र तेथे दुकाने फाटत नाहीत त्यांनी टाकलेल्या अघोषित बहिष्कारामुळे शनिवारपासून बिला येथील बाजारपेठेत भाजीपाला व फळे विक्रीची दुकाने दिसत नाही परिणामी ग्राहकांचा गरजेत अडचणी उत्पन्न झाले आहेत
ग्रामपंचायत कार्यालय ते लोक जीवन विद्यालय पर्यंतचा पूर्व पश्चिम मुख्य रस्ता केवळ15-16 फुटाचा अरुंद असा आहे रस्त्यावर दुकाने पुढे पुढे लावत असल्यामुळे तो काही ठिकाणी अजून लहान होतो रस्त्यावरील दुकानामुळे मुख्य रस्त्यावरून वाहतूक करताना अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते व ट्राफिक जामचा फटका बसून वाहनांच्या रांगा रस्त्यावर लागतात त्यातून वाहतुकीत बाधा येऊ नये यासाठी ठाणेदार पंकज वाघाडे यांनी भाजीपाला व फळे विक्रेत्यांची पोलीस ठाण्यात सभा घेतली त्या वेळी सरपंच तलाठी व ग्रामसेवक तथा आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते यामध्ये दैनंदिन भाजी बाजार रस्त्यावर भरवण्यास मनाई करण्यात आली
सदर भाजी बाजार ग्रामपंचायतचे मैदानात किंवा जिल्हा परिषदे च्या आठवडी बाजारातील ठोक्यावर भरवावा असे सरपंच व ठाणेदार यांनी सूचित केले परंतु पाच-सहा दिवस होऊनही भाजीबाजार येथे सुरू झाला नाही विक्रेत्यांच्या असहकार व बहिष्कारामुळे भाजीपाला व फळे विक्रीचा बाजार बंद पडला आहे त्यामुळे ग्राहकांना जीवनावश्यक भाजीपाला व फळावर मिळण्यास मुश्किल निर्माण झाली आहे