नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाद्वारे शहरात धडक कारवाई सुरु आहे. सोमवारी १२ ऑगस्ट रोजी जरीपटका येथील अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले. मंगळवारी झोन अंतर्गत श्री डॉ. रोहित बलदेव असरानी रा. ब्लॉक नं. 336 /A श्रीरंगी महाराज मार्ग जरीपटका नागपूर येथे अनधिकृत बांधकाम निर्दशनास आले. त्यांना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 54 अंतर्गत दिनांक 21/06/2024 रोजी झोन द्वारे नोटीस तामिळ करण्यात आली होती. नोटीसवर कुठलीही कार्यवाही न झाल्याने मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार आज सोमवारी अतिक्रमण विभागाद्वारे पोलीस विभागाच्या सहकार्याने बांधकाम तोडण्याची कारवाई करण्यात आली.
कारवाईच्या वेळी अतिरिक्त आयुक्त श्री अजय चारठाणकर स्वतः उपस्थित होते. कारवाई दरम्यान खूप तणाव निर्माण झाले होते. अंदाजे 100 पोलीस संरक्षण चे साहित्याने कारवाई करण्यात आली. कारवाईमध्ये अनधिकृत पद्धतीने बनवण्यात आलेले तळमजला, पहिला मजला, दुसरा मजला, तिसरा मजला आणि चौथा मजला च्या भिंतीच्या काही भाग तोडण्यात आला. तसेच पुढील कारवाई करिता डॉ. रोहित बलदेव असरानी यांना दोन दिवसाच्या अवधी देण्यात आला. तसेच त्यांच्याकडून प्रतिज्ञा पत्र घेण्यात आले.
• गांधीबाग झोन क्र ०६ आणि सतरंजीपुरा झोन क्र ०७ अंतर्गत झोन कार्यालय ते नंगा पुतला चौक ते टांगा स्टॅन्ड ते शहीद चौक ते जुना भंडारा रोड पर्यंत अतिक्रमण ची कारवाई करण्यात आली ज्या मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजू वरील रोड व फूटपाथ वर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले.
• गांधीबाग झोन क्र ०६ अंतर्गत झोन कार्यालय ते बडकस चौक ते महाल चौक ते लकडा पूल परिसर ते चीतार ओळी चौक ते महाल चौक पर्यंत अतिक्रमण ची कारवाई करण्यात आली ज्या मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजू वरील रोड व फूटपाथ वर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले असे अंदाजे 01 ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.
• मंगळवारी झोन क्र १० अंतर्गत झोन कार्यालय ते जिंजर मॉल चौक ते जरीपटका रोड परिसर पर्यंत अतिक्रमण ची कारवाई करण्यात आली ज्या मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजू वरील रोड व फूटपाथ वर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले.
• धरमपेठ झोन क्र.०२ अंतर्गत झोन कार्यालय ते व्हेरायटी चौक ते लोहा पूल चौक पर्यंत अतिक्रमण ची कारवाई करण्यात आली ज्या मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजू वरील रोड व फूटपाथ वर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले असे अंदाजे 01 ट्रक इतर साहित्य जप्त करण्यात आला.
• लक्ष्मीनगर झोन क्र ०१ अंतर्गत झोन कार्यालय ते लोकमत चौक ते न्यूरॉन हॉस्पिटल ते धंतोली गार्डन परिसर ते मीहाडिया चौक ते पंचशील चौक ते लोकमत चौक पर्यंत अतिक्रमण ची कारवाई करण्यात आली ज्या मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजू वरील रोड व फूटपाथ वर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले असे अंदाजे 01 ट्रक साहित्य जप्त करण्यात आला.
• मंगळवारी झोन क्र.१० अंतर्गत झोन कार्यालय ते सदर हल्दीराम परिसर ते स्मृती टॉकीज परिसर ते लिबर्टी चौक ते एल.आय.सी चौक ते रेल्वे स्टेशन परिसर ते कस्तूरचंद पार्क चौक ते परत एल.आय.सी चौक ते व्ही सी ए ग्राउंड ते माउंट रोड पर्यंत अतिक्रमण ची कारवाई करण्यात आली ज्या मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजू वरील रोड व फूटपाथ वर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले असे अंदाजे 05 ट्रक साहित्य जप्त करण्यात आला
• ही कारवाई .श्री. हरिष राऊत सहा. आयुक्त अतिक्रमण विभाग व संजय कांबळे प्रवर्तन अधिक्षक यांचे मार्गदर्शनात, श्री भास्कर माळवे , श्री विनोद कोकर्दे क.अभियंता अतिक्रमण पथक द्वारे करण्यात आली.