Published On : Sat, Jun 23rd, 2018

अनधिकृत धार्मिक अतिक्रमणे जमीनदोस्त

Advertisement

नागपूर: महानगपालिकेच्या अतिक्रमण विभागाने शुक्रवारी शहरातील अनधिकृत धार्मिक अतिक्रमणांवर बुलडोझर चालविले. विशेष म्हणजे, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याबाबत दिलेल्या दणक्यानंतर मनपाच्या कामाला गती आलेली आहे.

सार्वजनिक ठिकाणी आणि रस्त्यावर अवैध धार्मिक स्थळे, होर्डिंग्स, स्मारक, पुतळे उभारण्यात येऊ नये, अशी विनंती करणारी मनोहर खोरगडे यांची जनहित याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. या याचिकेवर झालेल्या विविध सुनावणीत सण, उत्सवाच्या काळात उभारण्यात येणारे मंडप, किंवा कमानी उभारण्यात येऊ नये. विनापरवानगी मंडप, कमानी उभारण्यावर मनपा आणि पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी असे उच्च न्यायालयाने वेळोवेळी आदेश दिले आहे.

Advertisement
Today's Rate
Wed 11 Dec. 2024
Gold 24 KT 78,100/-
Gold 22 KT 72,600/-
Silver / Kg 94,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सर्वोच्च न्यायालयानेही डिसेंबर २०१६ पर्यंत देशभऱ्यातील धार्मिक अतिक्रमणे काढण्याचा आदेश सरकारला दिले असून अतिक्रमण हटविण्याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती. याप्रकरणी बुधवारी झालेल्या सुनावणीत शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याबाबत आतापर्यंत कुठलीही कारवाई का झाली नाही? असा प्रश्न उपस्थित करीत न्यायालयाने मनपा आयुक्त व नासुप्र सभापतींना नोटीस बजावून गुरुवारी स्पष्टीकरणासह प्रत्यक्ष हजर राहन्यासचे आदेश दिले होते. तसेच गुरुवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने धार्मिक स्थळे हटविण्याबाबत एका आठवड्यात ‘अक्शन प्लॅन’ सादर करण्याचे आदेश दिले होते.

न्यायालयाच्या दणक्यानंतर शुक्रवारी अनधिकृत धार्मिक स्थळावर कारवाई करण्यात आली. यामध्ये लक्ष्मीनगर झोनमधील लक्ष्मीनगर चौक, शेवाळकर गार्डन परिसर व गोपालनगर येथील तीन अनधिकृत स्थळे तोडण्यात आली. धरमपेठ मधील वाल्मिकीनगर, गोकुळपेठ, अमरावती रोड, काचिपुर चौक, ईस्ट हायकोर्ट रोड व रामदासपेठ अश्या सहा ठिकाणी आणि इतर भागातील अजून पाच धार्मिक स्थळे तोडण्यात आले असून १५ स्थळांवर कारवाई करण्यात आली आहे. मनपातर्फे दररोज ३ झोनमध्ये आता कारवाई केली जाणार असून शनिवारी २३ जून ला नेहरूनगर, गांधीबाग व लकडगंज झोनमध्ये कारवाई केली जाणार आहे. या कारवाईदरम्यान कुठलीही अनुचित घटना होऊ नये किंवा तणाव वाढू नये याकरीता तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Advertisement