Published On : Sun, Jul 14th, 2019

खैरीत अनोळखी तरुणाचा खून

Advertisement

कामठी :- पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार कामठी नागपूर महामार्गावरील खैरी शिवारात येणाऱ्या एडेन ग्रीन्झ हॉटेल चे सुरक्षारक्षक नेहमीप्रमाणे रात्री 12 ते सकाळी 8 वाजेपर्यंतची रात्रपाळी नोकरी बजावून झाल्यानंतर यामार्गावरील दरगाह च्या बाजूला असलेल्या नहर च्या कडेला शौचास गेले असता याला एका इसमाचा मृतदेह खून केलेल्या स्थितीत दिसून आल्याने याला एकच धक्का बसला या घटनेची माहिती हवेसारखी पसरताच अर्ध्या तासांनी दुसरा सुरक्षारक्षक कामठी राहिवासी धीरज यादव यांनी पाहणी केली असता मूळच्या घटनास्थळी मृतदेह दिसून न आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले सदर घटनेची माहिती नियंत्रण कक्षाला दिली असता यासंदर्भात घटनेची माहोती जुनी कामठी पोलिसांना मिळताच एसीपी राजेश परदेसी, जुनी कामठी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक देवोदास कठाळे , पोलीस उपनिरीक्षक राहुल महिपाळे यासह पोलीस पथक, गुन्हे शाखा विभाग पथक, श्वान पथक, फॉरेन्सिक लॅब पथक आदींनी घटनास्थळ गाठून घटनास्थळा चा पंचनामा करीत शोधकामातुन दगडाने ठेचून खून केलेला दगड, तसेच मृतकाचे चप्पल जप्त करण्यात आले तसेच मृतदेह विहिरीतून बाहेर काढीत शवविच्छेदनार्थ कामठी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन गृहात हलविण्यात आले.मृतकाच्या शरीरावर फक्त पांढऱ्या रंगाची फुल टीशर्ट परिधान केले होते तसेच कमरेखाली काहीही वापरले नसल्याचे दिसत चेहऱ्यावर तसेच डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे निदर्शनास आले.मृतकाची अजूनही ओळख पटलेली नसून या खुन प्रकरणाचे गूढ रहस्य अजूनही गुलदस्त्यात आहे तसेच या प्रकरणाचा छडा लावीत घटनेचे रहस्य उघडकीस आणून आरोपीचा शोध लावण्यात पोलीस विभाग कसोशीने प्रयत्न करीत आहेत पोलिसांनी यासंदर्भात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Gold Rate
Wednesday 12 March 2025
Gold 24 KT 86,400 /-
Gold 22 KT 80,400 /-
Silver / Kg 98,300 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

बॉक्स:- खैरी शिवार अंतर्गत येणाऱ्या मो याकूब चिरागूद्दीन शाह दरगाह परिसरात दर गुरुवारी, रविवारी अनुयायांची झुंबड असते तर काही अनुयायी श्रद्धेच्या नावावर या परिसरातील मोकळ्या जागेत बिनधास्त पणे जुगार खेळ खेळून आनंदोत्सव साजरा करायचे या घटनास्थळी जुनी कामठी पोलिसांनी कित्येकदा धाडी घालून गुन्हे सुद्धा नोंदविण्यात आले आहेत तर या परिसराच्या निर्जन स्थळी हा मृतदेह सकाळी साडे सात वाजता गजानन ठाकरे नावाच्या सुरक्षा रक्षकाला दिसून येतो त्याच ठिकाणी अर्ध्या तासानंतर गेले असता मृतदेह चे घटनास्थळ बदलून मृतदेह झुडपातील विहिरीत फेकल्याचे दिसून येते यावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून या खून प्रकरणाचे गूढ रहस्य उलगडण्यास अडचणीत ठरत आहे.

संदीप कांबळे कामठी

Advertisement