Published On : Tue, Mar 2nd, 2021

कोळशाच्या १३ वॅगन रूळाखाली

Advertisement

-अजनी आणि पूर्णा स्थानकावरून १४० टन वजनी क्रेन,नागपूर, वर्धा स्थानकावरून दुर्घटना राहत व्हॅन

नागपूर: घुग्घुसवरून सोलापूर विभागाकडे निघालेली मालगाडी अचानक रुळावरून घसरली. या दुर्घटनेत कोळशाच्या तब्बल १३ वॅगन रुळाखाली आले. काही वॅगन तर एकावर एक चढले. चाक निघाला, रेल्वे रूळ वाकला. काही वॅगन दुरवर फेकल्या गेले. ही घटना मध्य रेल्वे नागपूर विभागाअंतर्गत कायर रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे रेल्वे मार्गावर सर्वत्र कोळसा पसरला. तसेच ओएचई तारही तुटले. या मार्गावर पॅसेंजर गाडी चालत नसल्याने प्रवाशांना दुखापत होण्याचा प्रश्न नाही.

Gold Rate
09 April 2025
Gold 24 KT 89,200/-
Gold 22 KT 83,000/-
Silver / Kg - 90,400/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मालगाडीला ५५ च्यावर वॅगन असतात. कोळशाची वाहतूक होत असल्याने या मालगाडीलाही ५५ पेक्षा अधिक वॅगन असावेत. घुग्घुसवरून निघालेली मालगाडी सुरळीत जात निघाली. सोलापूर विभागात जात जात असताना अचानक तांत्रिक बिघाड झाले आणि मालगाडीचे चाके रुळाखाली यायला लागले. एका मागून एक अशी तब्बल १३ वॅगन रुळाखाली फेकल्या गेली. रेल्वे रूळही वाकला यावरून घटना मोठी असावी असा अंदाज वर्तविला जात आहे. काही वॅगन रुळापासून दुरवर फेकल्या गेली.

या घटनेची माहिती लोकोपायलट,सहायक लोकोपालयट आणि गार्डकडून नागपूर विभागाला मिळाली. विभागीय रेल्वे व्यवस्थापक ऋचा खरे यांनी घटनेची गंभीरता लक्षात घेता पथक रवाना केले. अजनी रेल्वे स्थानकावरून १४० टन वजनी क्रेन घटनास्थळी रवाना करण्यात आली. तसेच पूर्णा रेल्वे स्थानक जवळ असल्याने तेथूनही १४० टन वजनी क्रेन पाठविण्यात आली. त्याच प्रमाणे नागपूर आणि वर्धा स्थानकावरून दुर्घटना राहत व्हॅन घटनास्थळी गेली. यासोबतच जवळपासच्या रेल्वे कर्मचाèयांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री ८ वाजेपासून मदत कार्याला सुरूवात झाली. त्यानंतर ठिकठिकाणचे मदत व्हॅन आणि के्रन तसेच रेल्वे कर्मचारी पोहोचत गेले. मदत कार्य रात्रभर सुरू होते.

या घटनेमुळे रेल्वे मार्गावर सर्वत्र कोळसा पसरला. तसेच ओएचई तारही तुटले. या मार्गावर पॅसेंजर गाडी चालत नसल्याने प्रवाशांना दुखापत होण्याचा प्रश्न नाही.

कोणालाही दुखापत नाही
घुग्घुसवरून सोलापूर विभागाकडे जाणाèया मालगाडीचे १३ वॅगन रुळावरून घसरले. या मार्गावर प्रवासी गाडी नसल्याने दुखापत होण्याचा प्रश्न नाही. अन्य गाडीच्या वेळेवर परिणाम झाला नाही. युध्दपातळीवर मदतीचे काम सुरू आहे. असे मध्य रेल्वेचे सहायक वाणिज्य व्यवस्थापक एस.जी. राव यांनी सांगितले.

Advertisement
Advertisement