Advertisement
नागपूर : शहरातील मेयो रुग्णालयाजवळ अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. महिला टीबी वॉर्ड क्र. 9 जवळ एक अनोळखी व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळून आल्याने याबाबत तहसील पोलिसांना माहिती देण्यात आली.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत त्या व्यक्तला मेयो हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले.
वैद्यकीय अहवालानंतर उपनिरीक्षक सागर यांनी याप्रकरणी तहसील पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृत व्यक्तीची ओळख आणि त्याचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्यापही सामोर आले नसून पोलिसांनी घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे.