Published On : Sun, Feb 16th, 2020

गॅस सिलेंडर दरवाढ विरोधात महिला कांग्रेस तर्फे केंद्र शासनाचा निषेध

कामठी :-चुलमुक्त भारत निर्मान करण्याचा उद्देशाने केंद्र सरकारने उज्वला गॅस योजना आणली मात्र या गॅस सिलेंडर चे भाव गगनाला भिडल्याने केंद्र सरकार कडून नागरिकांच्या पाठीवर हात फेरून पोटात सुरा खुपविण्याचा प्रकार करोत आहे तर आजच्या स्थितीत केंद्र सरकार च्या वतीने गॅस सिलेंडर चा दर एक हजार रुपयांच्या आत आहे तेव्हा सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना दरमहा गॅस सिलेंडर चा खर्च एक हजार रुपये महिना हा परवडण्यासारखा नसून नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडणारे आहे तेव्हा ही गॅस सिलेंडर दरवाढ थांबविण्यात यावी या मागणीसाठी आज सकाळी 11 वाजता जिल्हा महिला कॉंग्रेस कमेटी नागपुर ग्रामीण च्या वतीने गॅस सिलेंडरच्या दरवाढी विरोधात कामठी तहसिल कार्यालया समोर धरणे आंदोलन करून चुलीवर काळी चहा तयार करून ती चहा . तहसिलदार अरविंद हिंगे यांच्या समोर ठेवून यांच्या मार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सामूहिक निवेदन सादर करण्यात आले.

निवेदन देतांना जिल्हा महिला कॉंग्रेस कमेटी नागपुर ग्रामीणच्या अध्यक्षा तक्षशिलाताई वाघदरे, जिल्हा परिषद सदस्य तथा कामठी-मौदा विधानसभा प्रमुख (महिला कॉंग्रेस) व कामठी तालुका महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष प्रा. अवंतिकाताई लेकुरवाळे*, प्रदेश कॉंग्रेस कमेटीच्या सदस्य ज्योतीताई झोड, जिल्हा परिषद सदस्य मेघाताई मानकर, कामठी नगर परिषदेच्या नगरसेविका वैशालीताई मानवटकर, पंचायत समिती कामठीचे उपसभापती आशिष मल्लेवार, जिल्हा कॉंग्रेस कमेटीचे महासचिव आबिद ताजी, कढोली ग्राम पंचायतीच्या सरपंच प्रांजलताई वाघ, केम ग्रामपंचायतीचे उपसरपंच अतुल बाळबुधे, अर्जुन राऊत, दिनकर येंडे, विजय मेहर, सुरैया बानो, शाहेदा अंसारी, ममता कांबडे, मंदा चिमनकर, सुरैया बेगम, नरगिस कुरैशी, अनिता खोब्रागडे, सोना ठाकुर, कमरून निशा, फातमा बेगम, सलिया नातो, इरशत आरा, आशा गवरे, मैमूल निशा, समशाद बेगम, खालदा परविण, नसरीन कुरैशी, लक्ष्मी चौधरी, आदी उपस्थित होते.

Gold Rate
Saturday 22 Feb. 2025
Gold 24 KT 86,600 /-
Gold 22 KT 80,500 /-
Silver / Kg 97,200 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

संदीप कांबळे कामठी

Advertisement