नागपूर : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क बजावला.
केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नाने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर विकास कामे झालेली आहेत. सिंचन, कृषी, रस्ते, पायाभूत सुविधा सर्व क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहेत.
त्यामुळे महाराष्ट्रातील जनता यंदा विकासाला मतदान करणार आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. नितीन गडकरी यांनी कुटुंबासह महाल येथील महापालिकेच्या टाऊन हॉल येथे मतदान केले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
गडकरी यांचे मतदान मध्य नागपूर विधानसभा मतदान क्षेत्रांतर्गत येते. या मतदार संघात यंदा तिरंगी लढत आहे. येथून काँग्रेसकडून बंटी शेळके तर भाजपकडून प्रवीण दटके व अपक्ष रमेश पुणेकर हे उमेदवार आहेत.