Advertisement
नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज आपला 66 वा वाढदिवस साजरा करीत आहेत. गडकरी यांनी नातवंडं, कुटुंबीय, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आज आपल्या वाढदिवसाचा केक कापला.
गडकरी यांच्या नागपूरच्या घरी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज सकाळपासूनच कार्यकर्ते आणि मित्रमंडळींची मोठी रीघ लागली आहे. यादरम्यान नागपूरच्या भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये खूप उत्साह पाहायला मिळाला. कार्यकर्त्यांसाठी गडकरी यांच्या घरी मोठा डोम उभारण्यात आला असून, त्यांना शुभेच्या द्यायला येणाऱ्यांची गडकरी भेटी घेत आहेत.
येत्या वर्षी लोककसभा निवडणुका आहेत. यामुळेच हा वाढदिवस राजकीय दृष्टया महत्वाचा आहे. गडकरी यांच्या घरसमोर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याने शक्ती प्रदर्शन म्हणूनही याकडे पाहिले जात आहे.