नागपूर : केंद्र शासनाच्या सेवेत नव्याने नियुक्त झालेल्या उमेदवारांनी आपले ज्ञान वाढवण्यासाठी सतत अभ्यास, नवीन तंत्रज्ञानाचा वापर ,आपल्या अभ्यासाचा जीवनात तसेच समाजासाठी उपयोग , हार्ड वर्क सोबतच स्मार्ट वर्क त्याचप्रमाणे आरोग्याची काळजी या पाच सूत्रीवर लक्ष देणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी आज नागपूर मध्ये केले .
मध्य रेल्वेच्या अजनी येथील रेल्वे सामुदायिक सभागृहात आज रोजगार मेळा अंतर्गत केंद्रशासनाच्या सेवेत दाखल होणाऱ्या 210 उमेदवारांना नियुक्ती पत्राचे वितरण आज भागवत कराड यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक वर्षात १० लाख सरकारी नोकऱ्या देण्याच्या संकल्प सिद्धी करिता देशभरात 45 स्थानावर रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या चौथ्या रोजगार मेळाव्यात 71 हजार हून अधिक नवनियुक्तांना देशभरात विविध ठिकाणी नियुक्त पत्राचे वितरण झाले .
या कार्यक्रमांतर्गत नागपूर येथे केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड उपस्थित होते . याप्रसंगी मध्य रेल्वेचे नागपूर क्षेत्र महाव्यवस्थापक तुषार कांत पांडे , दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभाग महाव्यवस्थापक नमिता त्रिपाठी , नागपूर क्षेत्राच्या पोस्ट मास्टर जनरल शुभा मधाळे प्रामुख्याने उपस्थित होते . या मेळाव्यात दूरदृश्य प्रणालीव्दारे पंतप्रधानांचे भाषण सर्वांनी यावेळी ऐकले .
याप्रसंगी नवनियुक्तांना संबोधित करताना केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी सांगितलं की ,भारत हा जगातील सर्वात युवक असलेला देश आहे . नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे हात निर्माण करण्याकरिता केंद्रशासन विशेष लक्ष देत आहे . केंद्र शासनाने आतापर्यंत चार रोजगार मिळावे आयोजन केले असून यापैकी 22 ऑक्टोबर 2022 रोजी आयोजित पहिल्या मेळाव्यात 75 हजार 226 , 22 नोव्हेंबर 2022 रोजी आयोजित दुसऱ्या रोजगार मेळाव्यात 71 हजार 56 ,20 जानेवारी 2023 रोजी तिसऱ्या रोजगार मेळाव्यात 74,426 तर 13 एप्रिल 2023 रोजी आयोजित चौथ्या रोजगार मेळाव्यात 71 हजार 506