नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज सकाळी ग्रीन हायड्रोजनवरील कारने संसदभवनाकडे रवाना झाले. ग्रीन हायड्रोजनवर आधारित इंधन सेल इलेक्ट्रिक द्वारे ही कार चालविण्यात आली. ना. गडकरी यांनी आज या कारचे प्रात्यक्षिक दिल्लीकरांना करून दाखविले. ना.गडकरी यांनी ग्रीन हायड्रोजनवर आधारित इंधनास प्रोत्साहन देण्यासाठी व त्याच्या फायद्यांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या गरजेवर भर दिला.
देशात शाश्वत रोजगार निर्मिती करण्यासाठी ग्रीन हायड्रोजन भारतात निर्माण केला जाईल व ग्रीन हायड्रोजनच्या रिफिलिंग स्टेशनची निर्मितीही केली जाईल, असे आश्वासन देताना ते म्हणाले- भारत लवकरच ग्रीन हायड्रोजन निर्माण करणारा देश होईल.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या दृष्टिकोनातून भारताला स्वच्छ आणि अत्याधुनिक बनविण्याच्या दृष्टीने आमचे सरकार राष्ट्रीय हायड्रोजन मिशनद्वारे हरित आणि स्वच्छ ऊर्जेवर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी वचनबध्द असल्याचेही ना. गडकरी म्हणाले.