नागपूर – केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री तसेच नागपूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार ना. श्री. नितीन गडकरी उद्या (बुधवार, दि. २७ मार्च २०२४) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस व भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती असेल.
यासोबतच पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे, माजी राज्यमंत्री श्रीमती सुलेखाताई कुंभारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) नेते श्री. प्रशांत पवार, लोक जनशक्ती पार्टीचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष श्री. सतीश लोणारे देखील उपस्थित राहतील.
जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करण्यापूर्वी ना. श्री. नितीन गडकरी संविधान चौकात सकाळी ९.३० वाजता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बख्त बुलंद शहा चौकात चौकात गोंड राजे बख्त बुलंद शाह यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करतील. त्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना होतील.
यावेळी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती असेल.