– श्री संत रविदास मंदिरातील दान पेटी चोरी,पोलीस गस्त वाढविण्याची मागणी
खापरखेडा-परिसरात चोरीच्या घटनेत कमालीची वाढ झाली असून भूकट्या चोरट्यांनी मंदिरांना टार्गेट सुरू केले आहे नुकतेच भानेगाव परिसरात असलेल्या श्री संत रविदास महाराज मंदिरातील अज्ञात चोरट्यांनी दानपेटी चोरी केली असून पोलीस गस्त वाढविण्याची मागणी केल्या जात आहे.
परिसरात असलेल्या मंदिरातून दान पेटी चोरी करण्याच्या सपाटा अज्ञात चोरट्यांनी सुरू केला आहे भानेगाव परिसरातील श्री साई मंदिर, चनकापूर परिसरातील चमत्कारिक हनुमान मंदिरासह अनेक मंदिरात दानपेटी चोरी करण्याच्या घटना घडल्या असून हजारो रुपये चोरट्यांनी लंपास केले आहे मात्र सदर चोरटे पोलीसांना अजूनही गवसले नाही त्यामूळे अज्ञात चोरट्यांचे मनोबल उंचावले आहे.
३ आगस्ट च्या मध्यरात्री भानेगाव परिसरातील श्री संत रविदासजी महाराज मंदिरातून अज्ञात चोरट्यांनी दानपेटी चोरी केली असून अंदाजे ८-१० हजार रुपये लंपास केले आहे सदर घटना सकाळच्या सुमारास उघडकीस आली परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले मात्र काही तांत्रिक अडचणीमूळे चोरटे आढळून आले नाहीत यासंदर्भात मंदिरातील सचिव नरेश कनोजे यांनी चर्मकार समाज ऐकता संघटना /रविदास सेना युवा संघटना कडून रीतसर खापरखेडा पोलीस ठाणे गाठून चोरीच्या घटनेची तक्रार नोंदवली पोलीसांनी सदर घटनेची नोंद करून तपास सुरू केला आहे.
मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आव्हान
खापरखेडा पोलीस स्टेशन हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे मंदिरासह घरात कोणी नसल्याची संधी शोधून लाखोंचा मुद्देमाल लंपास केला आहे काही दिवसांपूर्वीच अन्नामोड परिसरातील एका चोरीचा घटनेचा खापरखेडा पोलिसांनी यशस्वी छडा लावला सदर चोरट्याकडून जवळपास ११ तोळे सोने, चांदी, दुचाक्यासह लाखोंचा मुद्देमाल जप्त केला परिसरातील बऱ्याचश्या मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत त्यामूळे चोरट्यांचे फावत आहे त्यामूळे मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आव्हान मंदिर समिती पदाधिकारी श्री श्यामराव सरोदे, अनेस चौरे, नरेश कनोजे, सुभाष चांदसरोदे, कैलास बर्वे किशोर तांडेकर रमेश चांदसरोदे राज तांडेकर कृष्णा बर्वे आदिनी केलेलिआहे.