नागपूर : शहरात 1 एप्रिल 2025 रोजी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी लावली. यादरम्यान ठिकठिकाणी रस्त्यावर झाडे कोलमडली यामुळे वाहतूक विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले.
गांधी पुतळा इतवारी साईबाबा बेकरीजवळ झाड कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर गंजीपेठ अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन कोलमडले झाड बाजूला केले. त्यानंतर बजनगर रोड लक्ष्मीनगर येथे रस्त्यावर झाड पडल्याची माहिती त्रिमूर्ती नगर अग्निशमन विभागाला मिळाली. याठिकाणी सुद्धा अधिकाऱ्यानी झाड बाजूला करून वाहतूक व्यवस्था पूर्वरत केली.
नागपुरात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा –
भारतीय हवामान विभागाने (IMD) विदर्भातील विविध जिल्ह्यांसाठी पुढील 3 ते 4 दिवसांसाठी येलो अर्लट जारी केले आहे. या काळात वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याची शक्यता आहे.
नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये 2 एप्रिल रोजी पाऊस आणि गडगडाटीची शक्यता आहे. चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळमध्ये तीव्र पाऊस आणि ढगाळ वातावरण अपेक्षित आहे. अमरावती, भंडारा, गोंदिया येथेही हलका पाऊस पडू शकतो.